esakal | हाथरस - मथुरेत PFI च्या 4 कार्यकर्त्यांना अटक; दंगलीच्या कटाचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

up police

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर दंगल घडवण्याचा कट असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला होता. या दाव्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून हाथरसमध्ये ये-जा कऱणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे.

हाथरस - मथुरेत PFI च्या 4 कार्यकर्त्यांना अटक; दंगलीच्या कटाचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर दंगल घडवण्याचा कट असल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने केला होता. या दाव्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून हाथरसमध्ये ये-जा कऱणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. यातच आता मथुरेतील चार जणांना अटक करण्यात आली आहे. हे चारही जण हाथरसला जात होते आणि ते पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मथुरेत गाड्यांची तपासणी केली जात होती. यावेळी चार जणांच्या गाडीची नंबर प्लेट दिल्लीची होती. तपासणी नाक्यावर चौकशी केली असता त्यांच्याजवळ मोबाइल, लॅपटॉपसह संशयास्पद साहित्य आढळून आले. अटक करण्यात आलेल्या चौघांची पोलिस चौकशी सुरु आहे. हाथरसमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिस नजर ठेवून आहेत. 

हे वाचा - बिहारचा रणसंग्राम : भाजपला उमेदवारांचा फेरविचार करणे भाग

उत्तर प्रदेशात जातीय दंगल घडवण्याचा कट रचला जात असल्याचा दावा राज्य सरकारने केला होता. शहरात दंगल घडवण्याची तयारी केली जात होती असं खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. 

उत्तर प्रदेश सरकारचा दावा आहे की , पीडितेला न्याय देण्याची लढाई आणि राजकारण यांच्या गदारोळात दंगलीचा कट रचण्यात आला होता. हा कट यशस्वी झाला असता तर संपूर्ण उत्तर प्रदेश यामध्ये पेटलं असतं. कट रचताना जस्टिस फॉर हाथरस नावाने संकेतस्थळ तयार करून त्यावरून आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर साहित्य अपलोड करण्यात आलं होतं. तसंच दंगली कशा घडवून आणायच्या याबाबतही सांगण्यात आलं होतं.