esakal | बिहारचा रणसंग्राम : भाजपला उमेदवारांचा फेरविचार करणे भाग
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

बिहार रणधुमाळीत भाजपप्रणीत एनडीएमधील फूट ही अर्धसत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या फडात भाजपपासून नव्हे, तर भाजप आघाडीपासून (म्हणजे नितीशकुमार यांच्यापासून) दूर गेलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे नवे नेते चिराग पासवान यांनी भाजपकडे जाणाऱ्या जागा न लढवता फक्त संयुक्त जनता दलाच्या विरोधात १४३ उमेदवार उतरविण्याचे जाहीर केल्याने त्यांचा दिल्लीतील ‘बोलविता धनी’ कोण, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बिहारचा रणसंग्राम : भाजपला उमेदवारांचा फेरविचार करणे भाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - बिहार रणधुमाळीत भाजपप्रणीत एनडीएमधील फूट ही अर्धसत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या फडात भाजपपासून नव्हे, तर भाजप आघाडीपासून (म्हणजे नितीशकुमार यांच्यापासून) दूर गेलेल्या लोक जनशक्ती पक्षाचे नवे नेते चिराग पासवान यांनी भाजपकडे जाणाऱ्या जागा न लढवता फक्त संयुक्त जनता दलाच्या विरोधात १४३ उमेदवार उतरविण्याचे जाहीर केल्याने त्यांचा दिल्लीतील ‘बोलविता धनी’ कोण, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आता ‘लोजप’च्या हिश्‍श्‍यात जाणाऱ्या २७ जागाही आपल्याला मिळाव्यात यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जोर लावला आहे. मात्र चिराग यांनी वेगळी चूल मांडल्याने बदलणाऱ्या राजकीय समीकरणांत भाजपला आपल्या संपूर्ण उमेदवार यादीचीच फेरछाननी करणे भाग पडले आहे.

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक अधिकारी शहीद 

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या अनुपस्थितीत लोजपचे नेतृत्व करणारे चिराग पासवान यांचा राजकीय अनुभव पहाता, भाजपमध्ये अंतर्गत सहमती बनल्याशिवाय ‘केंद्रात एनडीएमध्ये व राज्यात एनडीएबाहेर’ असे करूच शकत नाहीत असे जाणकार मानतात. ते बाहेर पडल्यावर नवीन समीकरणांत संयुक्त जनता दलाकडे २४३ पैकी १२२ तर भाजपकडे १२१ जागा जातील. 

पाकिस्तान-चीन सीमेवर एकाचवेळी युद्धासाठी तयार; हवाईदल प्रमुखांचे प्रतिपादन

अत्यंत आजारी असलेले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान सक्रिय होते तेव्हाही बिहार विधानसभा निवडणुकीत लोजपची ताकद मर्यादितच होती. मागील दोन निवडणुकांत तीदेखील घटल्याचे दिसते. रामविलास पासवान यांनी मागील १५ वर्षांत भाकप, राजद, संयुक्त जनता दल व भाजप अशा प्रत्येक काँग्रेसविरोधी पक्षाबरोबर युती केली आहे. मात्र विधानसभेत त्यांच्या पक्षाचे बळ कधीही १० आमदारांच्या पुढे जाऊ शकलेले नाही.

Edited By - Prashant Patil