Hathras Stampede: हाथरस प्रकरणी FIR दाखल, पण 'भोले बाबा'चं नावच नाही; एआयआरमध्ये नेमकं काय?

Hathras Stampede FIR has registered: ३ जुले रोजी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण, यामध्ये भोले बाबा उर्फ बाबा नायारण हरी उर्फ साकार विश्वा हर भोले बाबा यांचे नावच नाही.
Saakar Vishwa Hari Bhole Baba
Saakar Vishwa Hari Bhole Baba

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सत्संगासाठी जमलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यात आतापर्यंत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ३ जुले रोजी पहिला एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पण, यामध्ये भोले बाबा उर्फ बाबा नायारण हरी उर्फ साकार विश्वा हर भोले बाबा यांचे नावच नाही. 'हिंदूस्तान टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, सत्संग आयोजित करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर आणि इतर जणांविरोघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिकंदरा राव पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

Saakar Vishwa Hari Bhole Baba
Stampede Hathras: हाथरस सत्संग समारंभात चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा वाढला, 60 जणांचा मृत्यू...

भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ ( हत्येसाठी दोषी), कलम ११० (सदोष मनुष्यवध), कलम १२६(२) ( चुकीच्या पद्धतीने अटकाव), कलम २२३ ( सरकारी आदेशाचे उल्लंघन) अशा कलमाअंतर्गत आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saakar Vishwa Hari Bhole Baba
Hathras Stampede: स्त्री-पुरुषांचा समावेश असलेली नारायणी सेना भोले बाबासाठी काय काय करते? वाचा, नारायण साकारचे कारनामे

एफआयआरमध्ये नेमकं काय आहे?

-सुरज पाल उर्फ नारायण हरी उर्फ साकार विश्व हरी भोले बाबा याने सत्संग आयोजित केला होता. हाथरस जिल्ह्यातील फुलराई मुगलघडी येथे सत्संग आयोजित करण्यात आला होता.

- देवप्रकाश मधुकर याने प्रशासनाकडून जवळपास ८० हजार लोकांची परवानगी मागितली होती. त्यानुसार प्रशासनाने ट्रॅफिक आणि इतर तयारी केली होती. पण, सत्संगसाठी जवळपास अडीच लाख लोक आले होते. त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती.

-सत्संग संपल्यानंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडत होते. जे लोक बसले होते ते चेंगरले गेले. आयोजक समितीच्या सदस्यांनी जमावाला नियंत्रित करण्यासाठी काठ्यांचा वापर केला. त्यामुळे जमाव आणखी नियंत्रणाबाहेर गेला. यात लहान मुले, महिला, वयस्कर लोक चेंगरले गेले.

-पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते, त्यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. जखमींना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पण, आयोजकांकडून काही मदत करण्यात आली नाही. दुपारी २ वाजता भोले बाबाचा ताफा तेथून निघून गेला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com