
Train going wrong: तुम्ही कधी ऐकलंय की रेल्वेचा रस्ता चुकला? बिहारमध्ये घडली घटना..
माणसं अनेकदा आपला रस्ता चुकतात, पण तुम्ही कधी ऐकलंय का की रेल्वेचा रस्ता चुकला आहे? असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. 15653 गुवाहाटी - जम्मू तवी अमरनाथ एक्स्प्रेस बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी जंक्शनवर पोहोचली. बरौनी जंक्शननंतर ही रेल्वे समस्तीपूर जंक्शनला पोहोचणार होती पण ही रेल्वे अचानक विद्यापतीनगर स्टेशनवर पोहोचली.
रेल्वे पाहून अधिकाऱ्यांना धक्काच बसला..
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हर आणि इतर कर्मचाऱ्यांना या गडबडीची माहिती मिळेपर्यंत ट्रेन विद्यापतीनगरच्या बाहेरच्या सिग्नलवर पोहोचली होती. सोनपूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली ही चूक लक्षात आल्यावर गाडी मूळ रुळावर आणणे शक्यच झाले नाही.
हेही वाचा: फुकट्या रेल्वे प्रवासी संख्येत वाढ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हर आणि इतर कर्मचाऱ्यांना या गडबडीची माहिती मिळेपर्यंत ट्रेन विद्यापतीनगरच्या बाहेरच्या सिग्नलवर पोहोचली होती. सोनपूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली ही चूक लक्षात आल्यावर गाडी मूळ रुळावर आणणे शक्यच झाले नाही.या घटनेमुळे सोनपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीलमणी यांनी बचवाडा रेल्वे स्थानकाच्या दोन सहाय्यक स्टेशन मास्टर्सना निलंबित केले आहे. याशिवाय या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बिरेंदर कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. अमरनाथ एक्स्प्रेस दुसऱ्या मार्गावर होती मात्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिचा मार्ग बदलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दोषींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Web Title: Have You Ever Heard Of A Train Going Wrong Incident Happened In Bihar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..