सोनिया गांधींच्या आग्रहाला माजी पंतप्रधानांनी दिला मान; लढणार राज्यसभा निवडणूक

वृत्तसंस्था
Monday, 8 June 2020

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काही राष्ट्रीय नेते आणि पक्षाच्या आमदारांच्या आग्रहाखातर देवेगौडा यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी देवेगौडा यांचे मन वळवणे सोपी गोष्ट नव्हती, असं कुमारस्वामी म्हणाले आहेत. 

नवी दिल्ली- जनता दल सेक्युलरचे नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 19 जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ते कर्नाटक राज्यातून मंगळवारी आपल्या उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. देवेगौडा यांचे पुत्र आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काही राष्ट्रीय नेते आणि पक्षाच्या आमदारांच्या आग्रहाखातर देवेगौडा यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी देवेगौडा यांचे मन वळवणे सोपी गोष्ट नव्हती, असं कुमारस्वामी म्हणाले आहेत. 

कुमारस्वामी यांनी यासंबंधी ट्विट केलं आहे. पक्षाचे आमदार, सोनिया गांधी आणि अन्य राष्ट्रीय नेते यांनी आग्रह केल्यामुळे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या(मंगळवारी) आमला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सगळ्यांनी दिलेला प्रस्ताव मान्य केल्याबद्दल श्री देवेगौडा यांचे धन्यवाद, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

कर्नाटक विधानसभेत जनता दलजवळ 34 जागा आहेत. त्यामुळे पक्ष स्वत:च्या बळावर राज्यसभेची जागा जिंकू शकत नाही. त्यामुळे पक्षाला काँग्रेसची मदत घेणे आवश्यक आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेता मल्लिकार्जुन खरगे आणि डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेस आमदारांची बैठक सोमवारी पार पडली. त्यानंतर डीके शिवकुमार यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा तिसरा उमेदवार जिंकून येऊ नये अशी आमची इच्छा आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, 19 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार राजीनामा देत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी दोन उमेदवार निवडून आणणे काँग्रेससाठी आव्हानात्मक असणार आहे. शिवाय, भाजपला राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे एखादे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी त्यांना इतर पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे भाजप राज्यसभेत बहुमत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस भाजपला राज्यसभेत कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HD DeveGowda To Fight Rajya Sabha Polls At The Request Of Sonia Gandhi