esakal | मंत्री होऊन गोव्याला गेला अन् एका मसाजने...
sakal

बोलून बातमी शोधा

He went to Goa as a minister and has been seduced by a massage

आपण मंत्री असल्याचा बनाव करत गोव्यात सरकारी पाहुणचार घेणाऱ्या उत्तर प्रदेशातील सुनील कुमार सिंग नावाच्या व्यक्तीला आता पोलिसांचा पाहुणचार मिळत आहे. मूळ लखनऊचा असलेल्या सुनील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. सुनील कुमारने गोव्यात तब्बल 12 दिवस सरकारी खर्चात गोवा पर्यटन केलं आहे. त्यानंतर केवळ एका मसाजमुळे त्याची पोलखोल झाली.

मंत्री होऊन गोव्याला गेला अन् एका मसाजने...

sakal_logo
By
वृत्तसेवा

पणजी : आपण मंत्री असल्याचा बनाव करत गोव्यात सरकारी पाहुणचार घेणाऱ्या उत्तर प्रदेशातील सुनील कुमार सिंग नावाच्या व्यक्तीला आता पोलिसांचा पाहुणचार मिळत आहे. मूळ लखनऊचा असलेल्या सुनील कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. सुनील कुमारने गोव्यात तब्बल 12 दिवस सरकारी खर्चात गोवा पर्यटन केलं आहे. त्यानंतर केवळ एका मसाजमुळे त्याची पोलखोल झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लखनौत राहणाऱ्या सुनील कुमारने जवळपास १२ दिवस सरकारी सुविधांचा फायदा घेत आपण उत्तर प्रदेशातील मंत्री असल्याचं भासवलं. त्याच्या जोरावर त्याला राज्याच्या पाहुण्यांसाठी असेलल्या सर्व सेवा सुविधा मिळाल्या. यामध्ये सरकारी गाडी, एक पोलिस अधिकारी त्यांना पर्यटनासाठी सोबत देण्यात आला होता. एवढंच नाही तर दक्षिण गोव्यातील एका कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणेही करण्यात आले.

JNU Attack : स्मृती इराणींचे दीपिकाला थेट आव्हान; म्हणाल्या...

मंत्री असल्याची भासवून सुनील कुमार तेवढ्यावरच थांबला नाही. तर, त्याने ड्रिंकवेळी मसाज करण्यासाठी तरुणीची मागणी केली. त्यानंतर पोलिसांना थोडा संशय आला. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सुनील कुमार हा एक उत्तर प्रदेशात एका कोऑपरेटिव्ह सोसायटीचा माजी उपाध्यक्ष आहे. त्याच्याकडे राज्याचे कोऑपरेटिव्ह मंत्री गोविंद गौडे यांचे शिफारसपत्र होते असं सांगितले जात आहे. दक्षिण गोव्यात एका कार्यक्रमात त्याला प्रमुख पाहुणा करण्यात आलं होतं. तिथं सुनिल कुमारने 10 कोटी देण्याचं आश्वासनही देऊन टाकलं होते अशीही माहिती देण्यात आली आहे.

loading image
go to top