आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं केव्हा येणार लस; सर्वातआधी डोस घेण्याची दाखवली तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshwardhan_2.gif

कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस आपल्याला केव्हा मिळेल, असा प्रश्न भारतीयांना सतावू लागला आहे

आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं केव्हा येणार लस; सर्वातआधी डोस घेण्याची दाखवली तयारी

नवी दिल्ली- कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस आपल्याला केव्हा मिळेल, असा प्रश्न भारतीयांना सतावू लागला आहे. आरोग्य मंत्री हर्ष वर्धन Health Minister Harsh Vardhan यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये कोरोनावरील लस भारतीयांसाठी उपलब्ध होईल, असं ते म्हणाले आहेत.  'संडे संवाद' या ऑनलाईन कार्यक्रमात हर्ष वर्धन बोलत होते. 

कोरोना लशीबाबत कोणाला शंका असेल, तर ही लस मी सर्वातआधी घेण्यास तयार आहे. लस जेव्हा उपलब्ध होईल, तेव्हा ती सर्वात आधी आरोग्य कार्यकर्ते, वृद्ध नागरिकांना देण्यात येईल. कोरोना लशीची सुरक्षितता, किंमत, उपलब्धतात यासारख्या मुद्दांवर गहन चर्चा केली जात आहे. शिवाय ज्यांना सर्वाधिक गरज आहे अशांना ही लस देण्यात येईल. यावेळी त्यांची पैसे देण्याची क्षमता विचारात घेतली जाणार नाही, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं. 

गलवानमध्ये चीनचे किती सैनिक मारले गेले? अमेरिकेच्या वर्तमानपत्राने केला दावा

कोरोनावरील प्रभावी लस केव्हा येईल याबाबतची निश्चित अशी तारीख सांगता येणार नाही. मात्र, 2021 च्या सुरुवातीच्या तीन महिन्यात लस आपल्याला मिळू शकते. लोकांमध्ये या लशीबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी सर्वात आधी लशीचा डोस घेण्यास मी तयार आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि 55 वर्षांपुढील नागरिकांनी ही लस देण्यात येईल, असं हर्ष वर्धन यांनी सांगितलं आहे. सुरुवातीच्या काळात भारतात चांगल्या पीपीई कीट personal protective equipment तयार करणारी कंपनी नव्हती, पण आता 110 पेक्षा अधिक स्वदेशी कंपन्या पीपीई कीट तयार करत आहेत.  

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 94,372 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 47,54,356 वर जाऊन पोहचला आहे. आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिलीये. शनिवारी 1,114 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 78,586 झाली आहे. आतापर्यंत 37,02,295 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्र हा कोरोनाने सर्वाधिक प्रभावित राज्य ठरला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, तामीळनाडू आणि कर्नाटक या राज्यांचा क्रमांक लागतो. 

नासाला का हवी आहे चंद्रावरची माती आणि खनिज पदार्थ?

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मे महिन्यातील 50 हजारांवरून आता सप्टेंबर महिन्यात 37 लाखांपर्यंत पोहचली आहे. सध्या देशात दरदिवशी 70 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येपेक्षा 3.8 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सुरुवातीचे 5 लाख रुग्ण बरे होण्यास 38 दिवसांचा कालावधी लागला होता. आता हा आकडा 38 वरुन 7 दिवसांवर आला आहे. सध्या 7 दिवसांत 5 लाखांच्या वर रुग्ण कोरोनावर मात करत आहेत.  

(edited by- kartik pujari)


 

Web Title: Health Minister Harsh Verdhan Says When Will Vaccine Come 

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India
go to top