कोरोनाबाबत महाराष्ट्रासह १३ राज्यांना केंद्र सरकारचे पत्र | India Corona Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून लसीकरणाबाबत काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

कोरोनाबाबत महाराष्ट्रासह १३ राज्यांना केंद्र सरकारचे पत्र

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून लसीकरणाबाबत काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह १३ राज्यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यूचं प्रमाण जास्त आहे तिथं कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याचं आवाहन केलं आहे. राजेश भूषण य़ांनी महाराष्ट्र, नागालँड, सिक्कीम, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, लडाख या राज्यांना पत्र लिहिलं आहे.

जगातील इतर देशांमध्ये चौथ्या आणि पाचव्या लाटेचा हाहाकार सुरु असल्याचं राजेश भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच आता हिवाळ्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घ्या असं राज्यांना राजेश भूषण यांनी सांगितले आहे.

कोरोनाविरोधात लढ्यामध्ये देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. तर दुसऱ्या बाजुला आता कोरोना चाचण्यांचे प्रमाण मात्र वाढत नसल्याचं दिसत आहे असंही राजेश भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांना राजेश भूषण यांनी कोरोना चाचण्या वाढवण्याकडे लक्ष द्या असं सांगितलं आहे.

स्थानिक भाषेत मोबाईलच्या माध्यमातून आयव्हीआर संदेश देण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे. ज्यांना पहिला डोस मिळाला आहे आणि दुसऱाा द्यायचा आहे त्यांच्यासाठीचे संदेश स्थानिक व्यक्ती ज्याचा त्या भागात प्रभाव आहे अशा व्यक्तीच्या आवाजात रेकॉर्ड करा असेही केंद्राने म्हटले आहे. जिल्ह्यातील लसीकऱणापासून वंचित असलेल्यांची ओळख पटवणे आणि त्यांना प्राधान्याने लस देण्यासही या पत्रातून सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: दिल्ली प्रदुषणावर सरकार काहीच करत नाही : सर्वोच्च न्यायालय

याआधीही केंद्राने लसीकरणाबाबत राज्यांना सूचना दिल्या होत्यात. त्यात दुसऱ्या डोसवर लक्ष देण्यासह मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी स्थानिक लसीकरण दूतांना सहभागी करून घेण्यास आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं होतं. जिल्हा आणि गावाच्या लसीकरणासाठी लोकप्रिय असलेल्यांचा आणि ज्यांनी लस घेतली आहे अशा लोकांकडून जनजागृती करून घ्या. विविध भागातील नेते, विविध क्षेत्रात काम केलेले मान्यवर इत्यादींची लसीकरण दूत म्हणून नेमणूक करण्यात यावी असं राजेश भूषण यांनी म्हटलं.

loading image
go to top