esakal | Fight with Coronavirus : देशातील 'हे' २५ जिल्हे आहेत कोरोनामुक्तीच्या वाटेवर; महाराष्ट्रातील...!
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

या पाच राज्यांत ८८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Fight with Coronavirus : देशातील 'हे' २५ जिल्हे आहेत कोरोनामुक्तीच्या वाटेवर; महाराष्ट्रातील...!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. देशातील १५ राज्यांमधील असे २५ जिल्हे आहेत, जे कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सर्व २५ जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. मात्र, गेल्या १४ दिवसांत शासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे येथील कोरोनाग्रस्तांची संख्या घटलीच नाही, तर गेल्या १४ दिवसांपासून एकही नवीन कोरोनाची केस पुढे आलेली नाही. 

- मोठी बातमी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतिनील किरणांच्या टॉर्चची निर्मिती

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी म्हटले आहे की, या जिल्ह्यांत पुढील काळातही एकही कोरोनाचा रुग्ण आढळून येणार नाही, यासाठी सर्व प्रयत्न यापुढेही सुरू राहतील. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कंटेन्मेंट स्ट्रॅटेजीची त्वरीत अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. याचे परिणाम आता दिसत आहेत. जोपर्यंत पूर्ण देश कोरोनामुक्त होत नाही, तो पर्यंत हे सर्व प्रयत्न यापुढेही कायम राहतील. 

अगरवाल पुढे म्हणाले, 'प्रत्येक स्तरावर तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. याद्वारे लाईव्ह केस ट्रॅक केल्या जात आहेत. तसेच कंटेन्मेंट प्लॅनमध्येही याचा वापर केला जात आहे.'

- 'लोकांना जीवाचं पडलंय अन् मोदींना प्रचाराचं'; वाराणसीमध्ये 'मोदी गमछा'चे वाटप!

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असणाऱ्या २५ जिल्ह्यांमध्ये कर्नाटकमधील सर्वाधिक ४, त्यापाठोपाठ छत्तीसगढ, बिहार आणि हरयानामधील ३ तर केरळमधील २ जिल्ह्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत ८८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत म्हणाले की, गेल्या १०० तासांमध्ये उत्तराखंड राज्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. आतापर्यंत ७ लोक पूर्णपणे ठीक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याचे दिसून आल्यानंतर संवेदनशील भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. 

आणखी वाचा - वाचा शिस्तप्रिय जपानच्या लॉकडाऊन विषयी!

पुढील २५ जिल्ह्यांत गेल्या १४ दिवसांत आढळली नाही एकही कोरोना केस :
महाराष्ट्र - गोंदिया
छत्तीसगढ - राजनांदगाव, दुर्ग आणि विलासपूर
कर्नाटक - देवनगिरी, उडुपी, टुमकूर आणि कोडगू
केरळ- वायनाड आणि कोट्टायम
मणिपूर - पश्चिम इंफाळ
गोवा - दक्षिण गोवा
जम्मू-काश्मीर - राजौरी
मिझोराम - पश्चिम ऐंजॉल
पुदुच्चेरी - माहे
पंजाब - एसबीएस नगर
बिहार - पटना, नालंदा आणि मुंगेर
राजस्थान - प्रतापगड
हरयाना - पानिपत, रोहतक आणि सिरसा
उत्तराखंड - पौडी गढ़वाल
तेलंगणा - भद्राद्री कोट्टागुड़म