Omicron बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल | Corona Test | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron Positive I

Omicron बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल

नवी दिल्ली : रुग्णालयाच्या आयसीयू (Corona Patient In ICU ) विभागामध्ये दाखल झालेल्या आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) केलले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग किती धोकादायक आहे हे तपासण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (Health Ministry Changed Strategy Of Genome Sequencing Omicron)

हेही वाचा: देशात कोरोनाचा स्फोट; PM मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सामान्य लोकसंख्येच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing Omicron) हे ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही हे शोधण्यासाठी केले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढू लागले असून, मृत्यू देखील वाढले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगची नवीन रणनीती तीन दिवसांपासून कार्यरत असून, एका आठवड्याच्या आत, ओमिक्रॉनशी (Omicron) संबंधित प्रारंभिक डेटा ठोस स्वरूपात प्राप्त होईल असे सांगितले जात आहे. गेल्या 24 तासांत देशभरात ओमिक्रॉनच्या 620 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, देशातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण संख्या 5,488 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉनच्या एकूण बाधितांपैकी 2,162 रुग्ण बरे झाले आहेत. (Omicron Cases In India)

हेही वाचा: मोदी सरकारने स्वत:चाच निर्णय बदलला, मोठी कंपनी विकण्याचं स्थगित

PM मोदींची सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेणार आहेत. सांयकाळी चारच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत होत असून आठवड्याभरात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मोठी बैठक घेत आहेत. गेल्या 24 तासात जवळपास अडीच लाख नवे रुग्ण देशात आढळून आले आहेत. (India Covid Updates) गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी आरोग्य व्यवस्था सज्जता, कोरोना लसीकरण मोहिम आणि ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या परिणामाचा आढावा घेतला होता. या बैठकीत आरोग्य सचिवांनी जगभरातील रुग्णसंख्येच्या वाढीबद्दल माहिती दिली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top