
मानवी जीवन व जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी परिचारिकांची प्रतिबध्दता प्रशंसनीय आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिचारिकांच्या सेवाभावी कामाचा गौरव केला
परिचारिकांच्या कामाला सलाम - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - मानवी जीवन व जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी परिचारिकांची प्रतिबध्दता प्रशंसनीय आहे अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परिचारिकांच्या सेवाभावी कामाचा गौरव केला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित मोदींसह विविध राजकीय नेत्यांनीही परिचारिकांच्या कामाला सलाम केला. देशभरात आजमितीस किमान 30 लाख परिचारिका रुग्णसेवेचा कामात सक्रिय सहभाग देत आहेत. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण आजही फार कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार भारतात 43 लाख अतिरिक्त परिचारिकांची आवश्यकता आहे.
परिचारिका शास्त्राला आधुनिक दिशा देणाऱ्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिन १२ मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा केला जातो. कोरोनाच्या पार्सवभूमीवर यावर्षीच्या या दिवसाचे घोषवाक्य ‘परिचारिका - परिचर-नेत्तृत्व , रुग्णसेवेची बांधिलकी आणि जागतिक आरोग्य हक्कांची सुरक्षा' ही आहे. आमच्या पृथ्वीला सुरक्षित व आरोग्यदायी बनविण्यासाठी व तसे राखण्यासाठी परिचारिका महत्वाची भूमिका पार पाडतात असे सांगून पंतप्रधानांनी म्हटले की त्यांचे समर्पण व करूणाभाव अनुकरणीय आहे. सध्याच्या सर्वांत आव्हानात्मक काळातही असाधारण काम करणाऱया सर्व परिचारिकांची पुन्हा एकदा प्रश्ंसा करण्याची व त्यांचे आभार मानण्यासाठी हा दिवस ही उत्तम संधी आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही परिचारिकांच्या सेवाकार्याला सलाम केला आहे. त्यांची कठोर मेहनत व समर्पणामुळे भारतीय सुरक्षित आहेत. माणसांचे प्राण वाचविणाऱया व निस्वार्थ सेवा करणाऱया परिचारिकांना धन्यवाद, असेही गांधी यांनी म्हटले. दरम्यान भारतीय लष्करी रुग्णसेवेतर्फेही परिचारिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने लष्करी रुग्णेसेवेतील सर्व परिचारिका -परिचारक अधिकारी त्यांच्या सेवा गरजूपर्यंत पोहोचवतात, असे प्रतिपादन लष्करी रुग्णसेवेच्या प्रमुख स्मिता देवरानी यांनी केले.
Web Title: Health News International Nurses Day 2022 Prime Minister Narendra Modi Pride Of Service Oriented Work Of The Nurses
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..