'ठणठणीत' लोकांनो हात धुवत रहा; 2022 पर्यंत तरी तुम्हाला लस नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

एका ऑनलाईन कार्यक्रमात WHOच्या संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलंय की 2021 च्या अखेरपर्यंत एक प्रभावी लस जरुर येईल मात्र ती मर्यादीत प्रमाणात असेल.  

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सगळ्या जगास वेठीला धरलेले असताना कोणतीतर लस या संकटापासून आपल्याला दूर करेल अशी आशा सगळ्यांनाच लागून  राहीली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत अथवा नव्या वर्षाच्या सुरवातील एखादी परिणामकारक लस येईल, अशी चर्चा अलीकडे होताना दिसतेय. मात्र, असं झालं तरीही ठणठणीत तरुणांना लस मिळण्यासाठी 2022 पर्यंत वाट पहावी लागू शकते.  आलेली लस ही सगळ्यात आधी आरोग्य कर्मचारी आणि अशा काही लोकांना दिली जाईल ज्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. एका ऑनलाईन कार्यक्रमात WHOच्या संशोधक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलंय की 2021 च्या अखेरपर्यंत एक प्रभावी लस जरुर येईल मात्र ती मर्यादीत प्रमाणात असेल.  

तर खूप वाट पहावी लागेल
स्वामिनाथन यांनी लसीकरणाच्या प्राथमिकतेबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, बहुतांश लोक तर या गोष्टीशी सहमत असतील की सर्वांत आधी लस ही आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली गेली पाहिजे. तिथेही हे पाहिलं जाईल की कुणाला किती धोका आहे. त्यानंतर मग वयोवृद्धांना आणि मग याच पद्धतीने क्रमवारी करुन लसीकरण होईल. त्यांनी म्हटलंय की, सामान्य ठणठणीत माणसापर्यंत लस पोहचायला 2022 साल उजाडू शकतं. 

पहिल्यांदा कुणाला मिळेल लस?
स्वामिनाथन यांनी म्हटलंय की, अजून कुणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस बनवली नाहीये की ती सर्वांना पुरेल. म्हणूनच 2021 मध्ये लस तर असेल मात्र ती मर्यादीत असेल. म्हणूनच यासाठी एक आराखडा तयार केला गेला आहे जेणेकरुन हे ठरु शकेल की सर्वांत आधी कुणाला लस देण्यात यावी. लोकांना असं वाटतंय की, जानेवारी अथवा एप्रिल पर्यंत आपल्याला लस मिळून जाईल आणि त्यानंतर सगळं काही ठिक होईल. मात्रा, असं काही घडणार नाहीये. 

ऑक्सफर्ड लस यावर्षी येणे अवघड
ब्रिटनच्या कोरोना व्हॅक्सीन टास्क फोर्सचे चीफ केट बिंघम यांनी म्हटलं होतं की या वर्षाच्या अखेरपर्यंत ऑक्सफर्डची एस्ट्राझेनेका लस येईल मात्र ही शक्यता जास्त आहे की, ही लस पुढच्या वर्षाच्या सुरवातीला येईल. जगभरात सुरु असणाऱ्या लसनिर्मितीच्या स्पर्धेत ऑक्सफर्डची लस सर्वांत आघाडीवर मानली जात होती मात्र, मध्यंतरी या लशीची चाचणी थांबवावी लागली होती. 

लशीचा मार्ग सोपा नाहीये
जगभरात तब्बल 30 हजार लोकांवर सुरु असलेल्या चाचणीत एक व्हॉलेंटीअर आजारी पडल्यावर या लशीची चाचणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर ती पुन्हा सुरु करण्यात आली. त्याप्रमाणेच जॉनसनच्या लशीची चाचणीदेखील थांबवली गेली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: healthy people might be vaccinated till 2022 corona virus pandemic