esakal | शंभर दिवसांत १५ हजार प्रकरणांची सुनावणी
sakal

बोलून बातमी शोधा

court

लॉकडाउन लागू झाल्यानंतर २३ मार्चपासून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू झाली. आता  येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाकडून सामान्य कामकाजाची तयारी केली जात आहे. 

शंभर दिवसांत १५ हजार प्रकरणांची सुनावणी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरेाना संसर्गाचे आव्हान पेलत सर्वोच्च न्यायालयाच्या १०२१ पीठाने शंभर दिवसात १५,५९६ प्रकरणांची सुनावणी केली. यादरम्यान व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ५०,४७५ वकिलांनी पक्षकारांची बाजू मांडली. लॉकडाउन लागू झाल्यानंतर २३ मार्चपासून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू झाली. आता  येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाकडून सामान्य कामकाजाची तयारी केली जात आहे. 

कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांपासून मर्यादित स्वरुपात न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. यासाठी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मचा प्रभावीपणे वापर करण्यात आला. आता येत्या काही दिवसात तीन न्यायालयाचे कामकाज सामान्य करण्याची तयारी केली जात  आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने नियमित कामकाजाबाबत सुप्रीम कोर्टच्या ॲडव्होकेटस ऑन रिकॉर्ड असोसिएशनला माहिती दिली आहे. 

जगभरातील न्यायिक प्रक्रिया
    कालावधी : २४ मार्च ते १७ ऑगस्ट 
    ब्रिटन: २९ खटल्याचा निर्णय
    अमेरिका : ७४ खटल्यांवर सुनावणी आणि ४४ खटल्यांचा निर्णय
    युरोपिय युनियन : ७५ खटल्यांवर निर्णय

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

loading image
go to top