

Viral Story Man Protects Begging Girl from Train Harassers Marries Her
Esakal
Trending News: सोशल मीडियावर सध्या एका तरुण तरुणीच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. बिहारच्या बक्सार जिल्ह्यातल्या गोलू यादव नावाच्या तरुणाचा हा फोटो असून त्याचं कौतुक केलं जात आहे. गोलू यादवनं ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या एका अनाथ मुलीशी लग्न केल्यानं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्रेनमधून प्रवासावेळी गोलूला तरुण अनाथ मुलगी भीक मागताना दिसली होती. तिच्याशीच त्यानं लग्न केलंय.