
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि विरोधी पक्षातील महिला नेत्यांमध्ये शुक्रवारी बिहारच्या विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. बिहारमधील शाळांतील मुलींची संख्या अत्यंत कमी असल्याची खंत राष्ट्रीय जनता दलाच्या(आरजेडी) महिला आमदाराने व्यक्त केल्यानंतर नितीश आणि या आमदारामध्ये शाब्दिक चकमक उडाली.