North India Rain Update : 'उत्तर भारतात पावसाचा जोर कायम'; भूस्खलनाच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू, राजस्थानात मुसळधार
North India Flood Alert: पंजाबमधील शाळा आणि महाविद्यालये सोमवारीदेखील बंद ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे राजस्थानातदेखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून, पावसाशी निगडित घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सोमवारी पावसामुळे पुन्हा जनजीवन विस्कळित झाले. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.