उत्तर भारतात तुफान पाऊस; दिल्ली मुंबईसारखी तुंबली, ट्रॅफिकचे तीन-तेरा

टीम ई-सकाळ
Thursday, 20 August 2020

राजधानी दिल्लीच नव्हे तर, शहराच्या आसपास असणाऱ्या (North India) गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, वल्लभगड, फरिदाबाद, गुरुग्राम (Gurugram Rain), मानेसर, सोहना, सियाना, पलवल, बुलंदशहर परिसरात अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे.

नवी दिल्ली New Delhi Rain : दिल्ली आणि आसपासच्या शहरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिवसभर दिल्ली आणि परिसरात असाच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळं दिल्लीत अनेक सखलभागांमध्ये रस्स्त्यावर पाणी साचले असून, रस्ते वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

देशभरातली इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

कोठे आहे पाऊस?
राजधानी दिल्लीच नव्हे तर, शहराच्या आसपास असणाऱ्या (North India) गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, वल्लभगड, फरिदाबाद, गुरुग्राम (Gurugram Rain), मानेसर, सोहना, सियाना, पलवल, बुलंदशहर परिसरात अतिशय मुसळधार पाऊस पडत आहे. पुढचे काही तास या शहरांमध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्यां दिलेल्या इशाऱ्यानुसार दिल्ली आणि परिसरात येत्या 25 ऑगस्टपर्यंत कमी अधिकप्रमाणात पाऊस राहणार आहे. 

गुरुग्राम शहर तुंबले
आयटी हब म्हणून परिचित असलेल्या गुरुग्राम शहराला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. काल शहरातली अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळं शहरातली वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. आजही, शहरात अशीच परिस्थिती असल्यामुळं गुरुग्राम पोलिसांनी नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केलंय. अतिशय गरजेचं काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून गुरुग्राममधील जनतेला केलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in delhi ncr gurugram haryana water waterlogged