Sikkim Landslide: सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा धुमाकुळ; भूस्खलन, रस्ते बंदमुळे अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुटका

भूस्खलनात अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुखरुप सुटका केली
Sikkim
Sikkim Esakal
Updated on

सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. सिक्कीममध्ये भूस्खलन झाल्यामुळे काही ठिकाणचे रस्ते बंद झाले आहेत. यामुळे बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. अडकलेल्या तीन हजारहून अधिक पर्यटकांची सुटका केली आहे. या पर्यटकांची सुखरूप सुटका करून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुसळधार पावसामुळे उत्तर सिक्कीममधील अनेक भागातील रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आत्तापर्यंत भारतीय लष्कराने शनिवारपर्यंत अडकलेल्या 3 हजार 500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं आहे.(Latest Marathi News)

Sikkim
Earthquake: जम्मू काश्मीर पुन्हा हादरलं, 24 तासांत 5 वेळा भूकंप

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दोन हजार पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. 1500 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंगसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे लोक अडकलेले होते.(Latest Marathi News)

जिल्हा प्रशासनाकडून पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी 19 बस आणि 70 छोटी वाहने तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत तीन बस आणि दोन अन्य वाहने 123 पर्यटकांना घेऊन राज्याची राजधानी गंगटोककडे रवाना झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Sikkim
Kolhapur : दीड हजार सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू; हृदयद्रावक घटनेने हळहळ

बिपरजॉय चक्रीवादळामुळे काही राज्यांप्रमाणे सिक्कीममध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. गुजरातला धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम पूर्व भारतातील राज्यांवर होताना दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम देशभरात दिसून येत आहे. यामुळे गुजरात आणि राजस्थानसह पूर्व भारतातही पाऊस सुरु आहे.

Sikkim
Crime: रेल्वे स्थानकावरून मुलीचे अपहरण करून रायपूरला जाणाऱ्या आरोपीला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.