
Uttarakhand Flood
sakal
गोपेश्वर (उत्तराखंड) : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगफुटी व अति मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. चमोली जिल्ह्यातील चार गावांमध्ये गुरुवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पुरामुळे ३० हून अधिक घरे जमीनदोस्त झाली. यात चौदा जण ढिगाऱ्याखाली अडकले आणि २० जण जखमी झाले आहेत.