Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पूर
India Weather: गेल्या २४ तासांत देशभर मुसळधार पावसामुळे १२ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, तमिळनाडूसह देशाच्या विविध भागांत जोरदार पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये किमान १२ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत.