मुसळधार पावसामुळे मंगळूरला पूर, दोघांचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

मंगळूर - मुसळधार पावसामुळे मंगळूरमध्ये अनेक ठिकाणी झाडे आणि विद्युत पोलचे नुकसान झाले आहे. तसेच पूरामध्ये दोघांचा मृत्यु झाला आहे. तसेच पावसामुळे येथील उद्यानाजवळ लावलेल्या अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. किनारपट्टी लगत असेल्या परिसरात लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे. या आठवड्यात हवामान खात्याने २९ मे ते २ जून या कालावधीमध्ये केरळ व कोस्टल-कर्नाटक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच ४० ते ५० किमी वाऱ्याच्या वेगासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

दोन दिवसापुर्वी रात्री उशिरा पर्यंत विजांचा जोरदार तडाखा आणि ढगांचा गडगडाट चालू होता. तसेच सोमवार व मंगळवारी दुपारपासून रात्री उशिरा पर्यंत जोरदार पाऊस चालू होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंदीनुसार, मंगळवारच्या सकाळी पर्यंत 48.9 मिमी पाऊस पडला. नियमित कामाचे दिवस असल्याने शहरात विविध भागात वाहतूक विस्कळीत झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

तेथील रहिवाशी जोकिम पी यांनी बोलताना सांगितले,''मुसळधार पावसामुळे पुरात वाहनांमध्ये पाणी गेल्याने वाहन मालकांना जागेवर वाहने सोडून जावे लागले. शहराच्या वाहतूक पोलिसांनी काही क्षेत्रांत मेगाफोन वापरला. ज्यामुळे ते अनेक वाहनचालकांना सहजपणे बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करू शकले, तसेच अनेक ठिकाणाकची वाहतूक मार्गही बदलण्यात आले आहेत.

Web Title: heavy rains inundate mangaluru, two dead