सौंदत्तीमध्ये  रेणुका देवीच्या कुंडातून "धबधबा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

बेळगाव - सौंदत्ती रेणुका देवी मंदिर परिसरात गुरुवारी देवीच्या भक्तांसमोर कुंडातून धबधबा वाहतानाचे दृष्य पाहावयास मिळाले. डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी कुंडातून बाहेर निघाल्याने ही दृश्‍य पाहायला मिळाले. दरवर्षी पावसाळ्यात अशाप्रकारे पाणी वाहात असल्याचे देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी दैनिक "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

आज दुपारी सौंदत्ती परिसरात तासभर पावसाने हजेरी लावली. सौंदत्ती डोंगरावर मंदिरच्या मागे येण्णे कुंड (तीर्थकुंड) आहे. ज्याठिकाणी जिवंत झऱ्यातून सतत बारमाही पाणी वाहते. मंदिराला भेट देणारे सर्वच भाविक देवीचे तीर्थ म्हणून हे पाणी आपल्या घरी घेऊन जातात. तीर्थ कुंडाच्या ठिकाणी डोंगरभाग असून त्याठिकाणी पाणी साठत असल्याने हेच पाणी नंतर डोंगरातील झऱ्यातून वाहू लागते. याठिकाणी पाण्याची चांगली व्यवस्था असल्याने भाविकांसाठी स्नानगृहाची व्यवस्थाही केली आहे.

यात्रा काळात महिला आणि पुरुषांसाठी याठिकाणी स्वतंत्र व्यवस्था असते. एकाच वेळी 70 ते 80 भाविक याठिकाणी स्नान करतात. आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे झऱ्यासह डोंगराच्या मागील बाजूला असलेल्या भागातूनही याठिकाणी पाणी बाहेर वाहू लागले. तीर्थकुंडाचे ठिकाण उंचीवर असल्याने तसेच तीर्थकुंडापासून मंदिराचे ठिकाण उतारावर असल्याने पाण्याचा प्रवाह धबधब्याप्रमाणे दिसून आला. अनेक भाविकांनी हे क्षण आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Soundatti