
पूँच : थेट केलेले हल्ले भारताने परतवून लावल्याने पाकिस्तानने गुरुवारी रात्रभर संपूर्ण सीमेवर उखळी तोफांच्या माऱ्यासह जोरदार गोळीबार केला. जम्मू-काश्मीरमधील पूँच ते राजस्थानमधील जैसलमेरपर्यंत मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबारात महाराष्ट्रातील एक जवान हुतात्मा झाले. भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने आजही जम्मू, सांबा आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये ड्रोन हल्ले केल्याचे आणि हे हल्लेही निष्प्रभ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.