
Heeraben Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचं निधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज निधन झालं. त्या १०० वर्षांच्या होत्या. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना श्वसनाचात्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते
Heeraben modi Pm narendra modis mother passed away at 100
मोदी यांनी स्वतः ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, "शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम...मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है|मैं जब उनसे 100वें जन्मदिन पर मिला तो उन्होंने एक बात कही थी, जो हमेशा याद रहती है कि કામ કરો બુદ્ધિથી, જીવન જીવો શુદ્ધિથી यानि काम करो बुद्धि से और जीवन जियो शुद्धि से।"
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची तब्येत खालावल्याने त्यांना बुधवारी अहमदाबादच्या ‘यू एन मेहता इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी एंड रिसर्च सेंटर’ इथे अॅडमिट केलं गेले होते.
18 जूनला प्रधानमंत्री मोदींनी आपल्या आईचा 100 वा वाढदिवससुद्धा साजरा केला; आणि या संदर्भात त्यांनी एक भावनिक पोस्ट सुद्धा केली होती.