...म्हणून सनी देओल आणि हेमा मालिनी बसणार नाहीत एकत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hema malini sunny deol not to sit together in parliament

संसदेत हेमा मालिनी या मुलाशेजारी म्हणजे सनी देओल यांच्या शेजारी बसू शकणार नाहीत. लोकसभेत दोघेही वेगळ्या ठिकाणी बसणार आहेत.

...म्हणून सनी देओल आणि हेमा मालिनी बसणार नाहीत एकत्र

नवी दिल्लीः अभिनेता सनी देओल व अभिनेत्री हेमा मालिनी हे दोघेही लोकसभेत निवडून आले असून, 6 जूनला लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हे दोघे वेगवेगळ्या जागेवर बसणार आहेत. दोघे वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याचे कारण वेगळे आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल दोघेही निवडून आले आहेत. सनी देओल यांनी पंजाबमधील गुरुदासपूर तर हेमा मालिनी यांनी मथुरा येथून निवडणूक लढवली. सनी देओल हे प्रथमच खासदार म्हणून निवडून आले आहेत. हेमा मालिनी यांची मथुरेतून निवडणूक जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. संसदेत हेमा मालिनी या मुलाशेजारी म्हणजे सनी देओल यांच्या शेजारी बसू शकणार नाहीत. लोकसभेत दोघेही वेगळ्या ठिकाणी बसणार आहेत. कारण संसदेतील आसन व्यवस्थेच्या नियमानुसार नवनिर्वाचित खासदार हे मागच्या रांगेत बसतात.

लोकसभेत 300 नवनिर्वाचित खासदार आहेत. अभिनेता सनी देओल, गायक हंसराज हंस, क्रिकेटपटू गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर ही त्यापैकी काही नावे आहेत. हेमा मालिनी आणि सनी देओल यांनी एकत्र न बसण्याचे कारण म्हणजे संसदेची आसन व्यवस्था. हेमा मालिनी या लोकसभेत दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्या ज्येष्ठ खासदार आहेत. त्या संसदेत मधल्या रांगेत बसतील. सनी देओल हे नवनिर्वाचित खासदार असल्यामुळे मागच्या रांगेत बसतील.

कशी असते संसदेची आसन व्यवस्था
लोकसभेत निवडून आलेल्या प्रत्येक सभासदाला ठराविक जागा नेमून दिलेली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या उजवीकडील जागा या निवडून आलेल्या पक्षासाठी किंवा युतीसाठी राखीव आहेत. डावीकडील जागा विरोधी पक्षातील निवडून आलेल्या सभासदांसाठी आहेत. उजवीकडील पुढील रांग पंतप्रधान, केंद्रीय मंत्री व निवडून आलेल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसाठी आहेत. डावीकडील पहिल्या रांगेत विरोधी पक्षाचे प्रमुख व सत्तेत नसलेल्या पक्षांचे प्रमुख बसतील. दोन्ही बाजूंकडील मधल्या रांगा खासदारांना त्यांच्या अनुभवावरून दिलेल्या आहेत. मागील जागा या अनेकदा नवनिर्वाचित खासदारांसाठी असतात.

Web Title: Hema Malini Sunny Deol Not Sit Together Parliament

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top