Hema Malini Video: गंगा अवतरणापासून कृष्णलीलेपर्यंतचा प्रवास; हेमा मालिनींच्या नृत्यनाटिकेतून नदी प्रदूषणावर भाष्य

Braj Raj Utsav 2026 : वृंदावन येथे ‘ब्रजरज उत्सव २०२६’ची सुरुवात हेमा मालिनी यांच्या ‘गंगा अवतरण’ नृत्यनाटिकेने झाली. गंगेचे पृथ्वीवरील अवतरण, श्रीकृष्णलीला आणि गंगा-यमुना नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न या सादरीकरणातून मांडण्यात आला. नद्यांची स्वच्छता आणि संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.
Hema Malini performs the dance drama Ganga Avataran at Braj Raj Utsav 2026 in Vrindavan, highlighting Indian mythology and river conservation.

Hema Malini performs the dance drama Ganga Avataran at Braj Raj Utsav 2026 in Vrindavan, highlighting Indian mythology and river conservation.

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश ब्रज तीर्थ विकास परिषदेच्या वतीने आयोजित ‘ब्रजरज उत्सव २०२६’चा शुभारंभ वृंदावन येथील स्वामी हरिदास प्रेक्षागृहात उत्साहात झाला. या महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार पद्मश्री हेमा मालिनी यांच्या ‘गंगा अवतरण’ या नृत्यनाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. गंगेचे पृथ्वीवर अवतरण, विविध युगांतील पौराणिक प्रसंग, श्रीकृष्णलीला आणि नद्यांच्या प्रदूषणाची समस्या अशा विविध विषयांचे प्रभावी सादरीकरण या नृत्यनाटिकेत करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com