'भाजपचं जहाज आता बुडू लागलंय'

पीटीआय
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

- भाजपचं जहाज आता बुडू लागलंय

- वारे नेमके कोणत्या दिशेने वाहतंय हे मित्रपक्षांच्या लक्षात आलंय. 

नवी दिल्ली : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षांमधील संबंधांमध्ये अभूतपूर्व असा तणाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी आज भाजप नेत्यांवर निशाणा साधला. भाजपचे जहाज आता बुडू लागले असून, वारे नेमके कोणत्या दिशेने वाहते आहे हे मित्रपक्षांच्या लक्षात आल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सोरेन यांनी नमूद केले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

हेमंत सोरेने हे झारखंडचे माजी मुख्यमंत्री असून, झारखंड मुक्ती मोर्चाचे ते कार्यकारी अध्यक्षदेखील आहेत. भाजपच्या राजवटीमध्ये राज्यकारभार ढेपाळला असून, या मुद्द्यावर लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून वारंवार राष्ट्रवादाचे कार्ड पुढे केले जात आहे. आता राज्यातील निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरच होईल. भूसंपादन आणि बेरोजगारीचा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत. ही लोकसभेची नाही, तर विधानसभेची निवडणूक असून, ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरच लढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार

स्थानिक आदिवासींच्या हक्कांबाबत राज्याच्या निवडणुकीत बोलायचे नाही, तर मग कोठे बोलायचे, प्रत्येकवेळी राष्ट्रवादाचा मुद्दा कसा काय पुढे नेता येईल, मग लोकांचे प्रश्‍न कधी मांडायचे, असा सवालही त्यांनी या वेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hemant soren criticizes on BJP