Hemant Sorensakal
देश
Hemant Soren : झारखंडचा गड सोरेन यांनी राखला...इंडिया आघाडीला दोन तृतीयांश बहुमत; भाजपचा रथ रोखला
Jharkhand Election : हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीने झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव करत ५६ जागांवर विजय मिळवला. सोरेन यांचा चौथ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि भाकप-माले (एल) यांचा समावेश असलेल्या ‘इंडिया’ आघाडीने झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ पैकी ५६ जागा जिंकून विजय मिळविला आहे. ‘इंडिया’ आघाडीला दोन तृतीयांश एवढी मते मिळाली आहेत.

