Bihar Vidhansabaha
esakal
Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार
Jharkhand Mukti Morcha decides not to contest Bihar Assembly Elections : बिहारमध्य सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर झालेल्या आहेत. सत्ताधारी एनडीए आघाडी आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडीचे जागा वाटप झालेले आहे. बिहारच्या २४३ विधानसभा जागांसाठी निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
दरम्यान, बिहार निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे दोन दिवस आधीच जाहीर केल्यानंतर आता, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमधील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाने युटर्न घेत बिहार निवडणूक न लढवण्याची आज मोठी घोषणा केली. यामुळे इंडिया आघाडीला दिलासा मिळाला आहे.
जागा वाटपावरून सुरू असलेल्या ओढाताणीत झारखंड मुक्ती मोर्चाने म्हटले की, ते काँग्रेस आणि राजदबरोबरच्य युतीबाबत पुनरविचार करतील. एवढंच नाहीतर झामुमोने बिहारमधील जागा वाटपावरून सुरू असलेल्या ताणताणीला राजद आणि काँग्रेसचे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.
तर आता हेमंत सोरेन यांच्या पक्षाने, झामुमोने ज्या पद्धतीने बिहार निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवले त्याचा झारखंडच्या राजकारणावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरं तर, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बिहार निवडणुकीत झामुमोचा विश्वासघात झाला आहे.
जागावाटपाची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने बिहारमध्ये एकट्याने लढणार आणि सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. एवढंच नाहीतर झामुमोने शनिवारीच चकाई, धाम्धा, कटोरिया, मनिहारी, जमुई आणि पिरपैंती या जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.