Rahul Gandhi preparing sweets Video : राहुल गांधींनी तळली इमरती अन् बनवले बेसनाचे लाडू ; दुकानदार म्हणाला ‘’आता फक्त..’’

Rahul Gandhi preparing Imarti and Besan Ladoo : राहुल गांधींचा मिठाईच्या दुकानामधील हा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
Rahul Gandhi seen preparing traditional sweets — Imarti and Besan Ladoo — at a Delhi sweet shop during Diwali celebrations, as the video trends online.

Rahul Gandhi seen preparing traditional sweets — Imarti and Besan Ladoo — at a Delhi sweet shop during Diwali celebrations, as the video trends online.

esakal

Updated on

Rahul Gandhi Diwali Celebration at Delhi sweet shop : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दिवाळीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेतच, परंतु सध्या राहुल गांधींचा एक व्हिडिओ सर्वत्र प्रचंड व्हायरल होत आहे. राहुला गांधींनी जुन्या दिल्लीमधील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात जाऊन इमरती आणि बेसनाचे लाडू बनवले आहेत, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध मिठाईचे दुकान घंटेवाला स्वीट शॉप येथे राहुल गांधींनी भेट दिली. यानंतर त्यांनी दुकानातील मिठाई बनवणाऱ्या आचाऱ्याच्या जागेवर जात, तेथे इमरती तळली आणि बेसनाचा लाडू देखील तयार करून बनवला.

विशेष म्हणजे आपल्या या अनोख्या दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ राहुल गांधी यांनीच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत इमतरी तळताना आणि लाडू बनववताना राहुल गांधी मिठाईच्या दुकानदाराशी बोलताना दिसत आहेत तर दुकानदारही अतिशय खेळीमेळीने त्यांच्याशी बोलत होता.

Rahul Gandhi seen preparing traditional sweets — Imarti and Besan Ladoo — at a Delhi sweet shop during Diwali celebrations, as the video trends online.
Diwali festival : भारतात एक राज्य असंही जिथं आजही बहुतांश लोक दिवाळीच करत नाहीत साजरी, कारण...

या व्हिडिओबाबत केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे की, ‘’जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाईच्या दुकानात इमरती आणि बेसनाचे लाडू बनवण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपूर्वीपासूनच्या या दुकानातील मिठाईची गोडी आजही तशीच आहे- शुद्ध, पारंपारिक आणि मन जिंकणारी. दिवाळीची खरी गोडी केवळ थाळीतच नाही तर नाती आणि समाजातही असते.’’ तसेच, राहुल गांधींनी पुढे म्हटले आहे की, तुम्ही सर्वांनी सांगा, तुम्ही सर्वजण दिवाळी कशी साजरी करत आहात आणि ती कशी खास बनवत आहात?

मिठाईच्या दुकानदाराला राहुल गांधींच्या लग्नाची प्रतीक्षा –

जुन्या दिल्लीमधील प्रसिद्ध मिठाई दुकानदाराने राहुल गांधींना म्हटले की, ते सर्वजण आता फक्त तुमच्या लग्नाची वाट पाहात आहेत. दुकानदाराने म्हटलं की राहुल गांधींन आता लवकर लग्न करायला हवे.

या व्हिडिओत दुकानाचे मालक म्हणताना दिसत आहे की,  आम्ही तुमचे आजोबा जवाहरलाल नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांना मिठाई खाऊ घातली आहे. आता फक्त एकाच गोष्टीच प्रतीक्षा आहे, तुम्हाला विनंती आहे की लवकर लग्न करावे. तुमच्या विवाहाची प्रतीक्षा आहे. दुकानदाराच्या या म्हणण्यावर राहुल गांधी केवळ हासले आणि कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com