हेस्कॉमचे 35 कर्मचारी मदतीसाठी ओडिसाला रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

बेळगाव - ओडिसामध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या फणी चक्री वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील विविध भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी हेस्काॅमच्या बेळगाव विभागातील ३५ कर्मचारी ओडिसाला रवाना झाले आहेत.  

ओडिसात चक्रीवादळाने वीज खांब आणि वीज वाहिन्या मोडून पडल्या. याची दुरूस्ती न झाल्याने अजूनही काही भागातील वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तो सुरळीत करण्यासाठी देशाच्या विविध भागातून मदतीसाठी कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. ओडिसातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कार्याला मदत करण्यासाठी हेस्कॉमच्या बेळगाव विभागाचे 35 कर्मचारी बंगळूरवरून ओडिसाला रवाना झाले आहेत.

ओडिसा येथे 15 दिवस राहून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी हाती घेण्यात येणाऱ्या कामात 35 कर्मचारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.       

हेस्कॉमचे कर्मचारी यापूर्वीही विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीवेळी मदत कार्यात सहभागी झाले होते. गुरुवारी 35 कर्मचारी रवाना झाले आहेत ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी मदत कार्य सुरू होणार आहे.

- अश्विन शिंदे, सहायक कार्यकारी अभियंता

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hescom 35 workers go to Orissa for help electric work

टॅग्स