‘हिज्बुल’च्या म्होरक्याला पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Talib
‘हिज्बुल’च्या म्होरक्याला पकडले

‘हिज्बुल’च्या म्होरक्याला पकडले

जम्मू - हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला सुरक्षा दलांनी अटक केली. तालिब हुसेन गुज्जर असे त्याचे नाव आहे. काश्‍मीरमध्ये सुरू असलेल्या पंडितांच्या हत्यांमागे त्याचा हात असल्याचा संशय आहे. जम्मू-काश्‍मीर पोलिस, १७ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ यांनी राबवलेल्या संयुक्त मोहिमेत तालिबला किश्‍तवाड येथून शनिवारी अटक करण्यात आली. वेगवेगळ्या कारवायांमुळे तो गेल्या सहा वर्षांपासून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो किश्तवाड येथील नागसेन येथे लपून बसल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खोऱ्यात दहशतवाद पसरवण्याबरोबरच येथील स्थानिक तरुणांचे ‘ब्रेन वॉश’ करून त्यांना हिज्बुलमध्ये भरती करायचे काम देखील तो करत होता. मागील काही वर्षांपासून काश्मिरात झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांत तालिबचा सहभाग होता. त्यामुळे तो जिवंत हाती लागणे हे काश्मीर पोलिस आणि सैन्यदलाचे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान ‘टार्गेट किलिंग’ प्रकरणात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांची ओळख पटली असून, आत्तापर्यंत अशा स्वरूपाची ४७ ‘मोड्यूल’ उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे असे जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले.

Web Title: Hezbollah Leader Captured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top