देशातील पक्ष्यांच्या मृत्यूने `हायअलर्ट'; वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याची सूचना

High alert in the country over the death of birds
High alert in the country over the death of birds

नागपूर : जगभरात कोरोनाने लाखो लोकांचा जीव घेतल्यानंतर आता देशातील काही राज्यांमध्ये हजारो पक्षांचा मृत्यूच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. हे मृत्यू कशामुळे होत आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही. यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून, राज्यांना हाय अलर्ट जारी केले आहे. त्याच धर्तीवर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी तशाच अलर्ट दिला आहे.

राज्यात अद्याप एकाही पक्ष्याचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी सांगितले. मात्र, क्षेत्रीय वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसे पत्रही वन्यजीव विभाग आणि ११ वनवृत्तांच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेले आहेत.

केंद्राने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्याबाबत सूचित केलेले आहे. १९१८ दरम्यान पसरलेल्या स्पॅनिश फ्लूमध्ये तब्बल १० कोटी लोकांनी जीव गमावला, तर १९५७ मध्ये आशियाई फ्लूमध्ये तब्बल १० लाख लोक दगावले.

शिवाय हाँगकाँग फ्लूमध्येही १० लाख लोक दगावल्याची नोंद आहे. बर्ड फ्लू पक्ष्यांमधून कोंबड्यांमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. कोंबड्यांचा खाद्याच्या रूपानं जगभरात सर्वाधिक वापर केला जातो. हेच पाहता आता प्रशासनाला सतर्क राहणे गरजेचे झालेले आहे.

प्रवासी पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

पक्षांच्या मृत्यूच्या बातम्या येऊ लागल्याने पक्षांमध्येही कुठलातरी विषाणू तर पसरत नाही ना या गोष्टींची शंका येऊ लागली आहे. हजारो किलोमीटर दूरवरून भारतात येणाऱ्या प्रवासी पक्षांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. 

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com