High Court on islamic wedding : ''मुसलमान चार लग्न करू शकतात पण..'' मुस्लिम केसमध्ये हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं

मुस्लिम कायद्यानुसार भलेही एका व्यक्तीला ४ लग्नं करण्याचा अधिकार असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की, त्याने प्रत्येक पत्नीसोबत वेगवेगळा व्यवहार करावा.
High Court on islamic wedding
High Court on islamic wedding esakal
Updated on

नवी दिल्लीः मुस्लिम कायद्यानुसार भलेही एका व्यक्तीला ४ लग्नं करण्याचा अधिकार असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की, त्याने प्रत्येक पत्नीसोबत वेगवेगळा व्यवहार करावा. त्याला प्रत्येक पत्नीसोबत समान व्यवहार करावा लागेल आणि त्यांना समान अधिकार द्यावे लागतील, असं केलं नाही तर त्याला क्रूरता समजण्यात येईल; असं मद्रास हायकोर्टाने एका केसच्या निकालासंबंधाने म्हटलं आहे.

न्यायमूर्ती आरएमटी टीका रमन आणि पीबी बालाजी यांच्या खंडपीठाने महिलेच्या आरोपांना पुष्टी देत लग्न मोडण्याचे आदेश दिले. कोर्टाने कौटुंबिक कोर्टाच्या निर्णयाला कायम ठेवत म्हटलं की, पती आणि त्याच्या कुटुंबातील लोकांनी पहिल्या पत्नीचा छळ केला होता.

High Court on islamic wedding
Tesla: इलॉन मस्क गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

त्यानंतर सदर पतीने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं आणि तेव्हापासून तो तिच्यासोबत राहातो. कोर्टाने निकालात म्हटलं की, नवऱ्याने पहिल्या पत्नीला समान वागणूक देणं गरजेचं आहे. इस्लामिक कायद्यानुसार ते आवश्यक आहे. एक मुस्लिम व्यक्ती अनेक लग्न करु शकतो, परंतु त्यासाठी अट अशीय की, त्याने सगळ्या पत्नींसोबत समान व्यवहार केला पाहिजे.

High Court on islamic wedding
कतारमधील भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना मोठा दिलासा! भारत सरकारच्या प्रयत्नांना यश

पीडित महिलेचं म्हणणं होतं की, ती पहिली पत्नी होती. परंतु गरोदरपणात तिचा छळ करण्यात आला. यामध्ये सासू आणि नणंद सहभागी होते. ''गरोदरपणात माझा खूप छळ करण्यात आला. मला असं जेवण देण्यात येत होतं, ज्यामुळे मला अॅलर्जी होते. छळ केल्यामुळे माझं मिसकॅरेज झालं होतं. तरीही मीच बाळाला जन्म देऊ शकले नाही, असं म्हणत पुन्हा छळ झाला'' असे आरोप पीडितेने लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com