

Madhya Pradesh court
esakal
जबलपूर : मध्य प्रदेशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये कार्यरत न्यायाधीशांवर होणारे हल्ले आणि धमकीच्या घटनांमुळे जबलपूर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती संजीव सचदेवा आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला याबाबत स्पष्ट उत्तर देण्याचा आदेश दिला. “न्यायाधीशच जर सुरक्षित नसतील, तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहील आणि न्यायव्यवस्था कशी कार्यरत राहील?” असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला.