
Pakistan Attack: पाकिस्ताननं भारताच्या तीन राज्यांवर ड्रोन हल्ले सुरु केल्यानंतर त्याला भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर वेगवान घडामोडी घडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठक सुरु झाली आहे. तसंच भारताच्या तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांची देखील बैठक पार पडत आहे. तर दुसरीकडं भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे सचिव मार्को रुबिको यांच्याशी फोनवरुन चर्चा केली.