corona updates:देशासह राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ

वृत्तसंस्था
Thursday, 10 September 2020

सध्या महाराष्ट्रात 2 लाख 52 हजार 734 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात 6 लाख 86 हजार 462 जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे.

नवी दिल्ली:  जगासह देशात कोरोनाचा कहर वाढतानाच दिसतोय. कारण मागील 24 तासांत देशात 95 हजार 773 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून 1,172 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत भारतात कोरोनाची बाधा झालेल्यांचा आकडा 44 लाखांच्या वर गेला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 75 हजार 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  देशात सध्या 9 लाख 19 हजार 18 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. तसेच दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत 34 लाख 71 हजार 784 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health and Family Welfare.) दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यांची कोरोनाची आकडेवारी पाहिली असता चिंताजनक बाब म्हणजे महाराष्ट्र आघडीवर आहे. मागील 24 तासांत महाराष्ट्रात 23 हजार 816 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले असून यामुळे महाराष्ट्रातील कोरोना झालेल्यांचा आकडा 9 लाखांच्या वर गेला आहे. सध्या महाराष्ट्रात 2 लाख 52 हजार 734 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात 6 लाख 86 हजार 462 जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या पुणे जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांत तब्बल ४ हजार ८८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील नव्या रुग्णांचा आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. एकाच दिवसात पावणेपाच हजारांहून अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.  याकाळात राज्यात कोरोनाने 27 हजार 786 लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (Indian Council of Medical Research) 9 सप्टेंबरपर्यंत भारतात कोविड 19 च्या एकून 5 कोटी 29 लाख 34 हजार 433 चाचण्या झाल्याचे सांगितले आहे. तसेच काल एका दिवसात देशात 11 लाख 29 हजार 756 कोरोनाच्या चाचण्या झाल्याची माहिती ICMR ने दिली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The highest increase in corona patients in the state as well as in the country