
भारतात सर्वाधिक मृत्यू आत्महत्येमुळे, बिहारमधील परिस्थिती मात्र उलट
नवी दिल्ली : जगभरातील अनेक देश हत्यांसारखे (Murder) गुन्हे रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत असून, यासाठी अनेक देशांच्या सरकार मोठ्या प्रमाणात पैसादेखील खर्च केला जातो. मात्र, जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या एका विश्लेषणातून जगभरात, हत्येपेक्षा जास्त लोक आत्महत्येने (suicide) मरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिंतेची बाब म्हणजे जागतिक स्तरावरील या विश्लेषणात भारतात (India) आत्महत्येमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे असल्याचे समोर आले आहे. प्रत्येकी 5 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या 113 देशांमधील डेटाचे जागतिक विश्लेषण असे दर्शविते की, जागतिक स्तरावर आणि भारतात दोन्ही ठिकाणी आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. (Suicides Claim More Lives Than Murders In India survey)
हेही वाचा: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला : CRPF चा एक जवान शहीद, एक जखमी
भारताबाबत बोलायचे झाले तर येथे आत्महत्यांचे प्रमाण खूनापेक्षा जास्त आहे. मात्र, बिहार हे एकमेव राज्य आहे जिथे खुनाचे प्रमाण जास्त आहे. भारतात हत्येचे प्रमाण 2.2 टक्के आहे आणि आत्महत्येचे प्रमाण 11.3 टक्के आहे. जपानबद्दल बोलायचे झाले तर आत्महत्यांचे प्रमाण येथे खूनांच्या घटनांपेक्षा 57 पट जास्त आहे. श्रीलंकेत हत्येचे प्रमाण 3.5 टक्के आहे आणि आत्महत्येचे प्रमाण 19.2 टक्के आहे. नेपाळमध्ये हत्येचे प्रमाण 2.3 टक्के आहे, तर आत्महत्येचे प्रमाण 12.3 टक्के आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमारमध्येही हत्येपेक्षा आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.(suicide Ratio In India)
हेही वाचा: प्रवासासाठी बूस्टर डोस आवश्यक, केंद्रानं धोरण ठरवावं : पूनावाला
कोरानामुळे आत्महत्यांमध्ये वाढ
जगभरात कोरोनामुळे (Corona) झालेल्या लॉकडाऊनने (Lock down) हजारो लोकांना रोजगापासून मुकावे लागले आहे. एवढेच नव्हे तर, लॉकडाऊनमुळे घरात कैद झाल्यामुळे अनेक नागरिकांना मानसिक नैराश्याने ग्रासले होते. हे देखील आत्महत्येमागे प्रमुख कारण मानले जात आहे. मात्र, समोर आलेली ही आकडेवारी नक्कीच चिंतेची बाब असून, यावर जगातील देश कशाप्रकारे नियंत्रण मिळवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Web Title: Highest Number Of Suicides In India Says Survey
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..