श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला : CRPF चा एक जवान शहीद, एक जखमी | Terrorist Attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला : CRPF चा एक जवान शहीद, एक जखमी

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला : CRPF चा एक जवान शहीद, एक जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या (CRPF) तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला असून, एक जवान गंभीर जखमी झाला आहे. श्रीनगरच्या लाल चौक परिसरात दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली असून, दहशतवाद्यांच्या शोधासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. (Terrorist Attack In Srinagar Lal Chock Area )

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) लाल चौकातील सीआरपीएफ जवानांच्या तुकडीवर हा हल्ला करण्यात आला असून, यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. तर जखमी दुसऱ्या जवानाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. श्रीनगरमधील नरसुमा नगर म्हणून जो परिसर आहे त्याठिकाणी दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला आहे.

हेही वाचा: उत्तराखंडच्या आजींबाईंची कमाल, राहुल गांधीच्या नावावर केली संपत्ती

हल्ल्यात जखमी झालेल्या जवानाला जवळील रूग्णालयात दाख करण्यात आले असून, त्याच्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. परंतु, जखमी जवानाची प्रकृती नाजून असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत असून, आजच्या हल्ल्यामागे नेमका कुणाचा हात आहे आहे याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

Web Title: Terrorist Attack At Maisuma In Lal Chowk Srinagar One Crpf Jawan Died One Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..