Jalna Crime Update Police Sexually Abuse Women
Jalna Crime Update Police Sexually Abuse WomenSakal

महिलेनं उत्तेजक कपडे घातले म्हणून लैंगिक अत्याचार हे अमान्य - केरळ HC

केरळमधल्या न्यायालयाने सिविक चंद्रन प्रकरणात आपलं मत नोंदवलं असून हा आरोपीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांच्यावरील लैंगिक छळ खटल्यावरुन आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. आरोपीनं तक्रारदार महिलेनं उत्तेजक कपडे घातलेले फोटो सादर केले होते आणि त्याला या प्रकरणी जामीनही मंजूर झाला होता. मात्र महिला अनुसुचित जातीची आहे म्हणून तिच्या शरीराला स्पर्श करणं हे अविश्वसनीय आहे, असं न्यायालयाने आता म्हटलं आहे.

केरळमधल्या कोझिकोडे सत्र न्यायालयाने सिविक चंद्रन यांना २ ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. १७ जुलै रोजी एका दलित लेखिकेने चंद्रन यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायाधीश एस कुमार यांनी सांगितलं, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हे प्रथमदर्शनी आरोपीच्या विरोधात नाहीत कारण पीडित महिला अनुसुचित जातीची आहे, हे माहित असूनही तिच्या शरीराला स्पर्श करणं हे अविश्वसनीय आहे. समाजातील आरोपीची प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे. आरोपी जातिव्यवस्थेविरुद्ध लढत असून अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग आहे. पीडित महिला अनुसूचित जातीच्या सदस्याची आहे या माहितीवरून आरोपीचे कृत्य हे प्रथम माहितीच्या निवेदनात अजिबात नमूद केलेले नाही. आरोपी हा सुधारक असून तो जातिव्यवस्थेविरुद्ध लढण्यात गुंतलेला आहे, जातिहीनांसाठी लिहित आहे.

आरोपीचे वय आणि आरोग्याची स्थिती लक्षात घेता, त्याने त्याच्यापेक्षा उंच असलेल्या महिलेचे चुंबन घेतले यावर विश्वास ठेवता येत नाही, न्यायाधीश म्हणाले की, त्यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध होते, परंतु तिने लिहिलेल्या एका कामाच्या प्रकाशनावरून वाद झाला होता.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com