Hijab Controversy: हायकोर्टाने प्रकरण सोपवलं लार्जर बेंचकडे

Karnataka Hijab Row
Karnataka Hijab RowANI

बेंगलुरु: कर्नाटकमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालण्यासंदर्भातील (Hijab Controversy) वाद आता कोर्टामध्ये गेला आहे. यासंदर्भात आज हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी झाली. वकिलांचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कृष्णा दीक्षित यांच्या एकल पीठाने हे प्रकरण आता लार्जर बेंचकडे पाठवलं आहे. आता लार्जर बेंच या प्रकरणी पुढील सुनावणी करेल. (Karnataka hijab controversy)

कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब (Hijab Issue In Karnataka) प्रकणानंतर बेंगळुरूमधील शैक्षणिक संस्थांभोवती कलम 144 लागू करण्यात आले असून, पुढील दोन आठवडे शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटर परिसरात आंदोलन करता येणार नाही, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. नव्याने जारी करण्यात आलेले आदेश आजपासून लागू करण्यात आल्याचेही पोलिसांना स्पष्ट केले आहे. (Section 144 Imposed For Educational Institution )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com