‘हिजाब’ला संवेदनशील रुप नको

तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली
hijab
hijab Sakal

नवी दिल्ली : कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘हिजाब’बाबत दिलेल्या आदेशांना आव्हान देत त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. तत्पूर्वी उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांच्या आवारामध्ये धार्मिक पोशाखावर बंदी घालण्याचा अधिकार त्या संस्थांना असल्याचे नमूद केले होते. उच्च न्यायालयाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आव्हान याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना या प्रकरणाला संवेदनशील बनवू नका असे निर्देश दिले.

न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणीसाठी निश्चित अशी तारीख देण्यास देखील स्पष्ट शब्दांत नकार दिला. याचिकाकर्त्यांनी या प्रकरणावर पुढील आठवड्यामध्येच सुनावणी घेण्यात यावी अन्यथा मुलींना परीक्षा देण्यापासून रोखण्यात येईल असे सांगितले. त्यावर सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी या प्रकरणाचा परीक्षांशी कसलाही संबंध नसून उगाच त्याला संवेदनशील रूप देऊ नका अशा शब्दांत वकिलांना सुनावले. सरन्यायाधीशांनी भविष्यात याबाबत सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com