Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान, गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान, गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशात पावसाचे थैमान, गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात विविध भागात महापूर, भूख्खलन आणि अपघातामध्ये तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे उत्तराखंडच्या विविध भागात ढगफुटीच्या मालिकेत 4 जणांचा मृत्यू झाला, तर १० जण बेपत्ता झाले.

ऑरेंज अलर्ट दरम्यान शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात कहर केला आहे. मंडी, चंबा आणि कांगडा जिल्ह्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण बेपत्ता आहेत. मंडीमध्ये एकाच कुटुंबातील आठ, चंबामध्ये तीन, शिमला येथील थेओग आणि कांगडा जिल्ह्यातील प्रत्येकी दोन अशा 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशात पावसामुळे भूस्खलन, अचानक आलेला पूर आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये किमान 21 लोकांचा मृत्यू झाला, तर 6 जण बेपत्ता झाले आहेत.

कांगडा येथील ब्रिटीशकालीन चक्की खड्डावरील रेल्वे पूल कोसळला आहे. तर पठाणकोट ते जोगिंदरनगर या मार्गावरील सर्व गाड्यांची वाहतूक 17 जुलैपासून बंद आहे. खराब हवामानामुळे मणिमहेश यात्रा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. भरमौर-हडसर रस्ता सध्या ठप्प आहे.