esakal | आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण दु:खी - गडकरी
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण दु:खी - गडकरी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Min Nitin Gadkari) हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. आपल्या वक्तव्यांमुळे गडकरी अनेकदा चर्चेतही असतात. आता पुन्हा एकादा आपल्या वक्तव्यांमुळे गडकरी चर्चेत आले आहेत. राजस्थान दौऱ्यावर असणाऱ्या नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. जयपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच नेत्यांची फिरकी घेतली आहे. त्यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.

आजकाल प्रत्येकाच्याच समस्या आहेत, प्रत्येक जण दु:खी आहे. आमदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण दु:खी आहेत. आमदार मंत्रिपद न मिळाल्यामुळे दु:खी असतो. तर मंत्रिपद मिळालेला नेता चांगलं खाते न मिळाल्यामुळे दु:खी असतो. एखादा नेत्याला चांगलं मंत्रिपद मिळूनही दु:खी असतो. कारण, त्या नेत्याला मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे खंत असते. तर जे मुख्यमंत्री पदावर आरुढ होतात ते यासाठी चिंताग्रस्त असतात कारण माहीत नाही केव्हा पदावरून पायउतार व्हावं लागेल, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वच नेत्यांना धारेवर धरले.

हेही वाचा: ...अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, गडकरींचे अधिकाऱ्यांना खडेबोल

राजस्थानच्या विधानसभेद्वारे आयोजित एका कार्यक्रमात सोमवारी नितीन गडकरी सहभागी झाले होते. राजकारणाचा मुख्य उद्देश सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणं हा आहे, परंतु सध्या फक्त सत्ता हस्तगत करण्याशीच याचा संबंध लावला जातो. लोकशाहीचं मुख्य लक्ष्य समाजाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत लाभ पोहचवणं हा आहे, असं वक्तव्य यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.

loading image
go to top