
हिमाचल प्रदेशात यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन, ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात प्रचंड जिवीत आणि वित्तहानी झालीय. अधिकृत आकडेवारीनुसार २० जूनपासून आतापर्यंत ३१० जणांचा मृत्यू झालाय. यात १५८ जणांचा भूस्खलन, अचानक पूर, ढगफुटी, बुडून, वीजेचा धक्का किंवा इतर आपत्ती यामुळे मृत्यू झाला. तर १५२ जणांचा मृत्यू अपघातात झाल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलंय.