Video: हिमाचल प्रदेशात भूस्खलन; पूल कोसळून ९ पर्यटकांचा मृत्यू

दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारे व्हिडिओ व्हायरल
Himachal Pradesh landslide
Himachal Pradesh landslide

हिमाचल प्रदेशातील किनौर जिल्ह्यात भूस्खलनाच्या तावडीत सापडल्यानं नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरड कोसळल्याने दिल्ली आणि चंदीगडहून हिमाचल प्रदेशात फिरायला आलेल्या प्रवाशांच्या वाहनावर दगड कोसळले. यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांना जीव गमवावा लागला. (Himachal Pradesh Kinnaur Landslide Bridge Collapsed Baspa River 9 died aau85)

सुत्रांच्या माहितीनुसार, कनौर जिल्ह्यात बटसेरी येथील गुंसा येथे येथे ही दुर्घटना घडली. यामुळे दिल्ली आणि चंदीगड येथून हिमाचल प्रदेशात आलेल्या पर्यटकांची गाडी छितकुल येथून सांगलाच्या दिशेने जात असताना या गाडीवर ही दरड पडली. तसेच मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा आणि दगड कोसळळ्याने येथील बास्पा नदीवरील करोडो रुपये खर्चून तयार केलेला पूलही तुटला. यामुळे इतरही अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं घटनास्थळी पर्यटकांनी एकच आरडाओरडा सुरु केला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार जगतसिंह नेगी यांनी सांगितलं की, "इथे सध्या डोंगरांवरुन सातत्यानं मोठ-मोठे दगड कोसळत आहेत. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. जखमींना एअरलिफ्ट करण्यासाठी सरकारकडून हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. लवकरच ते घटनास्थळी दाखल होईल असं सांगण्यात आलं आहे. बटसेरी येथील स्थानिक नागरिकही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com