Himachal Pradesh Political Crisis: डिके निघाले! काँग्रेसचा संकटमोचक हिमाचलकडं रवाना; शिवकुमार करणार का डॅमेज कन्ट्रोल?

Himachal Pradesh Political Crisis: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची स्थिती असून काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिख्खू यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरु होती.
dk shivkumar himachal pradesh
dk shivkumar himachal pradeshesakal

Himachal Pradesh Political Crisis marathi news : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची स्थिती असून काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिख्खू यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा आहेत. पण या घडामोडींनंतर भाजपला इथं सरकार स्थापन करणं इतकं सोपं असणार नाही. कारण काँग्रेस हायकमांडंनं काँग्रेसच्या संकटमोचकाला हिमाचलची परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले आहेत. (himachal pradesh political crisis as per the directions of congress high command dk shivkumar going to himachal)

काँग्रेसचे संकटमोचक अर्थात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार होय. स्वतः शिवकुमार यांनी ट्विट करत आपण काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार हिमाचल प्रदेशकडे जायला निघालो आहोत असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

कोणत्याही अफवांमध्ये गुरफटण्याची गरज नाही, कारण मला विश्वास आहे की, काँग्रेस पक्षाचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहतील आणि त्यांना मिळालेल्या जनादेशाचं ते पालन करतील. मात्र, या प्रक्रियेत लोकशाही आणि जनतेचा जनादेश चिरडण्याचा मुद्दाम प्रयत्न करून सत्ता ओरबाडण्यासाठी भाजप कोणत्या थराला जात आहे, हा चिंतेचा विषय बनला आहे, असं डी के शिवकुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केवळ अफवाच

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर सुखविंदरसिंग सुख्खा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मला कोणीही राजीनामा मागितला नाही किंवा मी कोणालाकडंही राजीनामा सोपवलेला नाही. आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, आम्ही जिंकू आणि हिमाचलची जनताही जिंकेल"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com