हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; DMK च्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; DMK च्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; DMK च्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली : द्रमुकचे खासदार टीकेएस एलांगोवन (TKS Elangovan ) यांनी हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा भाषा-युद्धात नव्या वादाला तोंड फोडले आहे. एवढचे नव्हे तर, हिंदी ही केवळ शूद्रांसाठी असल्याचे विधान करत त्यांनी कथित जातीयवादी टिप्पणीही केली. त्यांच्या या विधानानंतर आता देशात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. (DMK MP TKS Elangovan Controversial Statment On Hindhi Language)

हेही वाचा: Ashok Saraf Birthday : हिंदी नकोच! मराठी चित्रपटांची धरली वाट, झाले मोठे स्टार

टीकेएस एलांगोवन की, "हिंदी ही केवळ बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान सारख्या अविकसित राज्यांमध्ये मातृभाषा आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब पहा. ही सर्व विकसित राज्ये नाहीत का? हिंदी ही या राज्यांतील लोकांची मातृभाषा नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा: हिंदी भाषा वादात सोनू निगमची उडी; म्हणाला,'भारताच्या समस्या वाढवू नका'

एप्रिलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा स्वीकारली जावी, स्थानिक भाषा नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता हिंदी आपल्याला क्षुद्र बनवू शकते. तसेच हिंदी आपल्यासाठी चांगली नाही, असे विधान टीकेएस एलांगोवन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता देशात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

Web Title: Hindi Language Of Underdeveloped States Will Make Us Shudras Says Dmk Mp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amit ShahLanguageDMK
go to top