हिंदी भाषा वादात सोनू निगमची उडी; म्हणाला,'भारताच्या समस्या वाढवू नका'Sonu Nigam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonu Nigam, upset on Ajay Devgan-Kiccha Sudeep’s statement on the national language,
गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेवरुन 'नॉर्थ-साऊथ' यांच्यात चांगलाच वाद रंगलेला आहे. #esakal #sonunigam #hindilanguage #controversy

हिंदी भाषा वादात सोनू निगमची उडी; म्हणाला,'भारताच्या समस्या वाढवू नका'

गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषेवरुन नॉर्थ-साऊथ यांच्यात चांगलाच वाद रंगलेला आहे. केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं की,'भारतात हिंदी भाषिक नसलेल्यांनाही हिंदी भाषेत बोलता आलं पाहिजे'. यानंतर दक्षिणेतल्या कलाकारांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच अजय देवगणने(Ajay Devgan) हिंदीला राष्ट्रभाषा(Hindi National Language) म्हटल्यानंतर कन्नड अभिनेता किच्चा सुदीपनं(Kiccha Sudeep) यावर प्रतिक्रिया दिली होती. यानंतर या वादात इतरही कलाकारांनी उडी घेतली होती. आता पुन्हा गायक सोनू निगमनं(Sonu Nigam) यावर आपलं मतप्रदर्शन केलं आहे.

हेही वाचा: प्रसिद्धीनंतरही काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक नाराज, म्हणाले,'Wikipedia वर...'

सोनू निगमनं काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा तो म्हणाला की,''संविधान मध्ये कुठेच असं लिहीलं नाही की हिंदी राष्ट्रभाषा आहे. असं कदाचित असेल की,हिंदी भाषा बोलणाऱ्यांची संख्या भारतात जास्त असेल,पण त्यामुळे ती राष्ट्रीय भाषा नाही''. सोनू पुढे म्हणाला की,"तामिळ आणि संस्कृत खरंतर खुप जुन्या भाषा आहेत. पण जास्त लोकांचं म्हणणं आहे की तामिळ संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. सोनू निगमनं सांगताना दटावलं की इतरही अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत ज्यांची चर्चा व्हायला हवी, उगाच भाषेच्या वादावरुन नवीन मुद्दे अन् त्यासोबत समस्या निर्माण करू नका''.

हेही वाचा: LockUpp: बाई की पुरुष यात अडकली होती सायशा,शारिरीक संबंधांविषयी मोठा खुलासा

तुमच्या माहितीसाठी नेमका वाद काय झाला होता ते थोडक्यात इथं सांगतो. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणनं ट्वीट करुन सांगितलं होतं की,''जर हिंदी राष्ट्रिय भाषा नाही आहे तर किच्चा सुदीप आपल्या सिनेमाला हिंदी भाषेत डब करुन का प्रदर्शित करतो''. याला उत्तर देताना दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीपनं सांगितलं होतं की,''त्याच्या बोलण्याचा अजय देवगणनं चुकीचा अर्थ काढला आहे''. किच्चा सुदीपनं लिहिलं होतं की,''सर,तुम्ही हिंदी भाषेत जे लिहिलं आहे ते मी समजलो. कारण आपण सारेच हिंदी भाषेचा सम्मान करतो. त्या भाषेवर प्रेम करतो आणि अर्थात ती बोलायला शिकलो देखील आहोत. तुम्ही माझं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नका. विचार करा,जर मी माझं बोलणं कन्नड मध्ये टाइप केलं असतं तर काय झालं असतं. आपण सगळे भारतीय आहोत ना?''

हेही वाचा: अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरुन वाद.. म्हणाले, हिंदी..

हिंदी भाषा वाद संदर्भात रोज कोण ना कोण बोलताना दिसत आहे. खरंतर हा वाद तेव्हा वाढताना दिसला जेव्हा बॉक्सऑफिसवर हिंदी सिनेमांपेक्षा दाक्षिणात्य सिनेमांनी अधिक बिझनेस केला. 'पुष्पा','आरआरआर','केजीएफ२' अशा दाक्षिणात्य सिनेमांची कितीतरी बॉलीवूड सिनेमांसोबत टक्कर झालेली दिसली.अन् त्यात भलेभले बॉलीवूडचे सिनेमे गारद झाले.

Web Title: Sonu Nigam Upset On Ajay Devgan Kiccha Sudeeps Statement On The National Language

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top