Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Engineering in Hindi : इंदूरच्या SGSITSमध्ये हिंदी माध्यमातून सिव्हिल बी.टेक; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी भाषेचा अडथळा दूर, अंतिम वर्षात राज्य सरकारकडून २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान
hindi medium engineering

hindi medium engineering

sakal

Updated on

मध्य प्रदेश : इंग्रजी माध्यमामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील श्री गोविंदराम सेकसरिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SGSITS)ने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात हिंदी माध्यमातून बी.टेकचा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश सरकारकडून बी.टेकच्या अंतिम वर्षात रु. २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे.

ग्रामीण आणि हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणातील भाषेचा अडथळा दूर व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शालेय शिक्षण हिंदी माध्यमातून झाल्यानंतर अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमातील इंग्रजी तांत्रिक संज्ञा समजून घेताना अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन SGSITSने हिंदी माध्यमातून स्वतंत्र बॅच सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com